spot_img
spot_img
spot_img
spot_img

पिंपरी गावात ताडी विक्रीवर छापा; १२५ लिटर मादक द्रव्य जप्त

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब

पिंपरी गाव परिसरात बेकायदेशीररीत्या ताडीची विक्री करणाऱ्या व्यक्तीवर दारूबंदी पथकाने कारवाई करत १२५ लिटर ताडी आणि इतर साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काटेपिंपळे जुना रस्ता परिसरातील मोकळ्या जागेतील पत्र्याच्या शेडमध्ये एका व्यक्तीकडून ताडीची अवैध विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार दारूबंदी पथकाने छापा टाकला.

कारवाईदरम्यान तेजस चंद्रकांत शिंदे (वय ३८, रा. पिंपरी गाव) याच्या ताब्यातून १२५ लिटर आंबट व उग्र वासाची ताडी तसेच दोन प्लास्टिक बॅरल असा ७ हजार ७५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तपासात जप्त केलेली ताडी श्रीकांत तामचिकर (रा. भाटनगर, पिंपरी) याच्याकडून आणल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

दारूबंदी पथकाकडून शहरात अवैध मद्यविक्री व मादक पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत असून अशा कारवाया सातत्याने सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!