पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब
पिंपरी परिसरात अवैधरित्या पिस्तूल बाळगणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेवाळे सेंटर रोड, पिंपरी येथे संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका व्यक्तीची तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्याच्या कमरेला लपवून ठेवलेले देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत राऊंड (काडतूस) आढळून आले.
या प्रकरणी तुषार ऊर्फ ‘भाजक्या’ तुळशीराम भिसे (वय २६, रा. कैलासनगर, डिलक्स चौक, पिंपरी) याला पोलिसांनी अटक केली आहे.
तपासात आरोपीने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने लागू केलेल्या हत्यारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचेही निष्पन्न झाले. आयुक्तालय हद्दीत १० जून ते २६ जून २०२६ या कालावधीत घातक शस्त्रे बाळगण्यास बंदी असतानाही आरोपी पिस्तूलासह फिरताना आढळला.
याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.




Total Users : 227437