मावळ तालुक्यातील वराळे (वॉर्ड क्र. २) येथे ग्रामपंचायत सदस्य कल्पेशभाऊ मराठे यांच्या पुढाकारातून सुमारे १ कोटी ५५ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास आमदार सुनिल अण्णा शेळके यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या सोहळ्यामुळे वराळे गावाच्या सर्वांगीण विकासाला आणखी बळ मिळणार असून, स्थानिक पातळीवर पायाभूत सुविधांच्या उभारणीस गती मिळणार आहे. गेल्या २०१९ नंतरच्या सहा वर्षांत गावात नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात आलेल्या विकासकामांमुळे अंतर्गत रस्ते, गटार व्यवस्था, पाणीपुरवठा, सभा मंडप, घंटागाडी, जिम साहित्य, स्ट्रीट लाईट यांसारख्या मूलभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे.
वराळे (वॉर्ड क्र. २) येथे पार पडलेल्या विकासकामांच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यात आमदार सुनील आण्णा शेळके यांनी ग्रामपंचायत सदस्य कल्पेशभाऊ मराठे यांच्या कामकाजाचे व नियोजनशैलीचे विशेष कौतुक केले.
यावेळी बोलताना आमदार शेळके म्हणाले की, “गावाच्या विकासासाठी केवळ निधी उपलब्ध करून देणे पुरेसे नसते, तर त्या निधीचा योग्य नियोजनबद्ध वापर होणे तितकेच महत्त्वाचे असते. कल्पेश मराठे यांनी अत्यंत प्रभावी आणि दूरदृष्टी ठेवून विकासकामांचे नियोजन केले असून, त्याचा थेट लाभ ग्रामस्थांना होत आहे.”

गेल्या काही वर्षांत वराळे गावात झालेल्या पायाभूत सुविधांच्या उभारणीचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, रस्ते, गटार व्यवस्था, पाणीपुरवठा, स्ट्रीट लाईट, सभा मंडप यांसारख्या सुविधा उभारण्यात कल्पेश मराठे यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यामुळेच गावाचा विकास वेगाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
विशेष म्हणजे, विविध प्रकल्पांसाठी तब्बल ७३ कोटी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, या निधीच्या माध्यमातून वराळे गाव विकासाच्या नव्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे. हा विकास केवळ आकड्यांपुरता मर्यादित न राहता, प्रत्येक नागरिकाच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवणारा ठरत आहे.

यावेळी बोलताना ग्रामपंचायत सदस्य कल्पेशभाऊ मराठे यांनी सांगितले की, “ग्रामस्थांच्या विश्वास आणि सहकार्यामुळेच हा विकासाचा प्रवास शक्य झाला आहे. पुढील काळातही अधिक वेगाने आणि प्रभावीपणे विकासकामे राबवण्याची आमची ठाम वचनबद्धता आहे.”
या कार्यक्रमास श्री विठ्ठल आण्णा शिंदे, गणेश भाऊ खांडगे, पल्लवीताई दाभाडे, साहेबराव कारके, मनोज भाऊ येवले, दिलीपभाऊ ढोरे, राजेंद्र कडलक, बबन दादा भोंगाडे, ज्ञानेश्वर जी मराठे, भरत भाऊ घोजगे, शहाजी अण्णा मराठे, बळीराम मराठे, बाळासाहेब दाभाडे, अतुल मराठे, देविदास मराठे, अनिता मराठे यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकूणच, वराळे गावात सुरू असलेली विकासाची ही गती आगामी काळातही कायम राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
यापुढेही अशाच पद्धतीने काम करत राहिल्यास वराळे गाव आदर्श गाव म्हणून ओळखले जाईल, असा विश्वास आमदार शेळके यांनी व्यक्त केला.





Total Users : 239877