spot_img
spot_img
spot_img

अकोल्यात अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत विवाहित महिलेवर अत्याचार

तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल

शबनम न्यूज | प्रतिनिधी

अकोला शहरात अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत एका विवाहित महिलेवर वारंवार अत्याचार करून तिचे शारीरिक व मानसिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात पीडित महिलेला धर्मांतरासाठी सातत्याने दबाव टाकण्यात आल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला असून, सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, तिसरा आरोपी सध्या रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. डाबकी रोड परिसरात राहणाऱ्या आणि ब्युटी पार्लर चालवणाऱ्या विवाहित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून हा प्रकार समोर आला आहे.

फिर्यादी महिला गांधी रोड परिसरातील खंडेलवाल ज्वेलर्स शेजारी असलेल्या ‘परिबिंदी घर’ या दुकानात सौंदर्यप्रसाधन साहित्य खरेदीसाठी नियमित जात होती. नवीन साहित्य उपलब्ध झाल्यास माहिती देण्याच्या उद्देशाने दुकान संचालकाने तिचा मोबाईल क्रमांक घेतला. त्यानंतर विविध कारणांवरून संपर्क साधत आरोपीने हळूहळू तिचा विश्वास संपादन केला.

तक्रारीनुसार, आरोपीने तिचे अश्लील चित्रीकरण करून तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. या धमकीच्या आधारे तिला दगडी पूल परिसरातील एका फ्लॅटवर नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यात आले. यानंतर आरोपीने अशा प्रकारचे आणखी व्हिडिओ तयार करून त्याच्या आधारे महिलेला ब्लॅकमेल केले व तिच्याकडून पैशांची मागणी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास सिटी कोतवाली पोलीस करत असून, आरोपींविरोधात संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!