पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीची धामधूम सध्या शहरात जोरात सुरू असून प्रत्येक राजकीय पक्षाचे उमेदवार प्रचारात सक्रिय झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १५ मध्ये शिवसेनाच्या शहर संघटिका तथा सरिता साने सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष सौ. सरिता अरुण साने यांनी आपल्या प्रचाराला वेग दिला आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १७ मध्ये प्रचाराला वेग आला आहे. या प्रभागातून शिवसेनाच्या वतीने जनतेशी थेट संवाद साधत सामाजिक प्रश्नांना प्राधान्य देण्याचा ठाम निर्धार व्यक्त करण्यात येत आहे. “लोकांसाठी, माणुसकीसाठी, प्रत्येक क्षण समर्पित” या ब्रीदवाक्यासह सुरू असलेल्या उपक्रमांना महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
महिलांच्या प्रश्नांना अग्रक्रम देत आरोग्य, शिक्षण, सुरक्षितता, स्वावलंबन आणि रोजगार यांसारख्या मुद्द्यांवर सातत्याने चर्चा केली जात आहे. महिलांना सामर्थ्यवान करण्यासाठी विविध सक्षमीकरण उपक्रम राबवण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे. घराघरांत भेटी देत समस्या समजून घेणे, महिलांसोबत बैठका घेऊन उपाययोजना मांडणे आणि स्थानिक पातळीवर तातडीने मदत पोहोचवणे—या माध्यमातून विश्वासार्ह नेतृत्वाचा संदेश पोहोचवला जात आहे.
लोकांच्या हक्कांसाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याची भूमिका स्पष्ट करत, विकासकामे आणि सामाजिक उपक्रमांचा वेग वाढवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. प्रभाग १५ मध्ये सुरू असलेल्या या संवादप्रधान प्रचारामुळे महिलांसह सर्व घटकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, आगामी निवडणुकीत याचा परिणाम दिसून येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
प्रभाग क्रमांक १५ मधील सर्व भागांमध्ये त्यांचा सघन जनसंपर्क सुरू असून घराघरात भेटीगाठी, महिलांशी संवाद, ज्येष्ठ नागरिकांशी चर्चा अशा माध्यमातून त्या मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. त्यांच्या प्रचाराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून मतदारांचा प्रचंड पाठिंबा त्यांना मिळताना दिसत आहे.
आनंदी, हसमुख व मनमिळाऊ स्वभावासोबतच विकसनशील दृष्टिकोन ही त्यांची ओळख असल्याने प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी त्या सक्षम नेतृत्व देतील, असा विश्वास मतदार व्यक्त करत आहेत. प्रभागाचा कायापालट करून तो ‘स्मार्ट प्रभाग’ म्हणून विकसित करण्याची त्यांची ठाम भूमिका नागरिकांना भावत आहे.
प्रचारादरम्यान अनेक मतदारांनी त्यांच्या कार्यकौशल्याचे कौतुक केले, तर अनेक ज्येष्ठ महिला व ज्येष्ठ नागरिकांनी निवडणुकीत यश मिळविण्यासाठी त्यांना आशीर्वाद दिले. एकूणच प्रभाग क्रमांक १५ मध्ये त्यांचा प्रचार दिवसेंदिवस अधिक बळकट होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.


