शबनम न्यूज | प्रतिनिधी
येत्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. ५ मधून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्यावतीने प्रियांका ताई प्रवीण बारसे या निवडणूक रिंगणात असून त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. प्रियांका ताई बारसे यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. आज प्रचाराचा तिसरा दिवस असून मतदारांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.

प्रचाराची औपचारिक सुरुवात करत त्यांनी प्रभागातील गाठीभेटींवर विशेष लक्ष केंद्रित केले असून, नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या, अपेक्षा व विकासविषयक सूचना जाणून घेत आहेत. या प्रचाराला मतदारांकडून मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
प्रचारादरम्यान अनेक ठिकाणी मतदारांनी प्रियांका ताई बारसे यांचे औक्षण करून त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या आशीर्वादाने त्यांना पाठिंबा दर्शविला. नागरिकांचा हा विश्वास आणि सहभाग पाहता, आगामी निवडणुकीत मतदार प्रियांका ताई बारसे यांना नक्कीच संधी देतील.
प्रभागातील सर्वांगीण विकास, महिला सक्षमीकरण आणि मूलभूत सुविधांवर भर देत प्रचार अधिक व्यापक करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.




