शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पुनावळे: एकीकडे मुख्यमार्गाचे युद्ध स्तरावर काम सुरू असून दुसरीकडे श्री शिवाजी महाराज भुयारी मार्ग पुनावळे चौक या ठिकाणी वाहतुकीच्या कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे पुनावळेकर नागरीक त्रस्त झाले होते.रोजच्या रोज वाहतूक कोंडीच्या तक्रारी वाढतच होत्या त्या तक्रारींना आळा बसवण्यासाठी व पुनावळे करांना वाहतूक कोंडीतून मुक्तता मिळण्याकरता व मोकळा श्वास घेता यावा याकरिता भाजपचे शहर सचिव- नवनाथ ढवळे व सौ. सुमनताई नवनाथ ढवळे यांनी तक्रारींना प्रामुख्याने लक्ष देऊन पिंपरी चिंचवडचे आदरणीय आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पुनावळे येथील विस्कळीत वाहतूक समस्येचे निवारण करता यावे या हेतूने स्वयं खर्चातून वाहतूक वार्डन ची नेमणूक केली असून , वार्डन ची संख्या १० असेल, हे वार्डन दिवस व रात्र अशा शिफ्ट मधे वाहतूक नियंत्रणासाठी काम करणार असून ते सर्व जण वाकड वाहतूक अधिकारी यांच्या सुचने प्रमाणे काम करणार आहेत .
पुनावळे करांच्या वाहतूक समस्येवर उपाययोजना केली, त्यामुळे पुनावळेकर श्री व सौ ढवळे दाम्पत्यांना मनापासून आभार मानत असून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव करीत आहे.






Total Users : 213521