spot_img
spot_img
spot_img

पूर्व उच्च प्राथमिक, माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

शबनम न्यूज | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २२ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात येणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचे नियमित शुल्कासह अर्ज भरण्यास दिनांक ८ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
परीक्षेचे शाळा नोंदणी व विद्यार्थ्यांचे अर्ज http://www.mscepune.in या संकेतस्थळावर विलंब शुल्कासह ९ ते १५ डिसेंबर, अतिविलंब शुल्कासह १६ ते २३ डिसेंबरपर्यंत तसेच अतिविशेष विलंब शुल्कासह २४ ते ३१ डिसेंबरपर्यंत सादर करता येतील. ३१ डिसेंबरनंतर कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अथवा ऑफलाईन आवेदनपत्र भरता येणार नाही, याची नोंद घ्यावी, असे परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!