spot_img
spot_img
spot_img

गीता जयंती महोत्सव मोशीत उत्साहात होत आहे संपन्न

शबनम न्यूज | प्रतिनिधी

महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान संचलित वेदश्री तपोवन आयोजित प.पू. जगद्‌गुरु शंकराचार्य कांची कामकोटि पीठाधिपति स्वामी श्री विजयेन्द्र सरस्वतीजी महाराज यांच्या उपस्थितीत व लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली गीता जयंती महोत्सव 2025 याचे आयोजन करण्यात आले.

सदर कार्यक्रम वेदश्री तपोवन वेद विद्यालय, मोशी येथे दि. 29, 30 व 1 डिसेंबर अशा तीन दिवस हा कार्यक्रम संपन्न होत आहे.सदर कार्यक्रम अभय सुरेश कुमार भुतडा यांच्या सहकार्याने संपन्न होत आहे.

सदर कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न झाले. या कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड मधूनही अनेक मान्यवरांनी उपस्थित दर्शवली. यामध्ये अण्णासाहेब मगर बँकेचे माजी अध्यक्ष राजेश सस्ते, सामाजिक कार्यकर्त्या अर्चनाताई सस्ते व माजी नगरसेविका सारिकाताई बोऱ्हाडे यांनीही आपली उपस्थिती दर्शविली. सदर कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!