spot_img
spot_img
spot_img

मनपा वतीने दिवंगत माजी महापौर मधुकर पवळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दिवंगत माजी महापौर मधुकर पवळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस शहर अभियंता मकरंद निकम यांच्या हस्ते तर निगडी येथील लोकमान्य टिळक चौकातील त्यांच्या पुतळ्यास सहाय्यक आयुक्त तथा क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील कार्यक्रमास माजी नगरसदस्या सुमन पवळे,सह शहर अभियंता बापू गायकवाडउपायुक्त अण्णा बोदडेविशेष अधिकारी किरण गायकवाडजनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह मधूकर पवळे यांच्या नातेवाईक अनिता लांडेसुनिता चोरघेरेणुका उत्तेकरज्योती गवारेराजलक्ष्मी चोरघेओंकार पवळेविनीत गवारेसिद्धिराम शिरसाईल आदी उपस्थित होते.

तर निगडी येथील कार्यक्रमास माजी नगरसदस्य अजित गव्हाणेमाजी नगरसदस्या सुमन पवळेप्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर ढवळे,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते संतोष कवडेपंकज बगाडेराजाराम राऊतभिकाजी केंजळेलहू धुमाळसचिन रोमनतुकाराम राऊतराजाराम लोंढेविनीत गवारेविनायक चोरघे यांच्यासह पवळे कुटुंबीय व नागरिक उपस्थित होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!