मारुती जाधव यांच्या पुढाकाराने उपक्रम संपन्न
शबनम न्यूज | प्रतिनिधी
मारुती जाधव मित्र परिवार यांच्या माध्यमातून भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 11 मधील नागरिकांसाठी नुकतेच नोकरी महोत्सव, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रभागातील नागरिकांनी या उपक्रमांना उस्फूर्त प्रतिसाद देत कार्यक्रमाला हजेरी लावली.
यावेळी 62 रक्तदात्यांनी आज रक्तदान केले, 160 तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. तसेच साडेतीनशे महिलांची आरोग्य तपसणी केली.

कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते निलेश नेवाळे, माजी नगरसेविका योगिता नागरगोजे, सारिका पवार, कविता हिंगे,माजी नगरसेवक अजय सायकर, सुहास ताम्हाणे, यशवंत कन्हेरे, शिवानंद चौगुले, घरकुल फेडरेशनचे अध्यक्ष अशोक मगर, प्रीती बोंडे,महादेव कवितके, पोपट हजारे,हर्जित बारडा , शैलेश कुलकर्णी, विजय घोडके,नितीन आकोटकर, अतुल सोंडेकर, महेश गायकवाड,पन्नालाल जाधव, सागर नरळे, शुभम मोरे, दशरथ शिंदे,सुरेश वैरागर, संतोष माळी,संदीप रोकडे, एड महेंद्र कुमार गायकवाड, भगवान शिंदे, नर्सिंग वैरागर, दत्ता धर्मे, अभी जाधव, तेजस कडलक, मयूर भोसले, अक्षय ओहोळ,कुणाल पळसकर, धनंजय जाधव, निलेश मस्के, सोमा शिंदे, योगेश अवसरमल, संतोष जाधव, निखिल आरणे, आकाश चव्हाण,दिलीप गायकवाड, राहुल ठाकरे, स्वप्निल काटे, जयंत पालांडे, संदीप दीक्षित,सुरेखा पवार, पल्लवी देवगिरे, वंदना जाधव, अश्विनी शिंगाडे, रजनी सांडभोर आदी मान्यवर उपस्थित होते.








