spot_img
spot_img
spot_img

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर

शबनम न्यूज | प्रतिनिधी

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त, शिवसेना युवा सेना पिंपरी चिंचवड उप शहर प्रमुख निखिल दळवी यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच निखिल दळवी यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन देखील करण्यात आले. या रक्तदान शिबिरामध्ये मोफत रक्त तपासणी ,मोफत डोळे तपासणी शिबिर, मोफत बॉडी फॅट चेकअप शिबीर (मशीन द्वारे), तसेच मोफत कांस्य मशीन मसाज आदी चेकअप उपलब्ध करून देण्यात आले.

या रक्तदान शिबिरामध्ये 249 रक्तदात्यांनी रक्तदान केले. डोळे तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी 180 नागरिकांनी तपासणी केली, 165 नागरिकांनी आपले रक्त तपासून घेतले. तब्बल 295 नागरिकांनी बॉडी फॅट तपासणी करून घेतली. मोफत आयुर्वेदिक कांस्य मशीन मसाज करण्याचा 305 नागरिकांनी लाभ घेतला. सदर शिबिर कार्यक्रमाला प्रभाग क्रमांक 14 दत्तवाडी, मोहन नगर, काळभोर नगर, चिंचवड स्टेशन, रामनगर मधील सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला .कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना संघटक महाराष्ट्र वसंत मोरे व माजी आमदार जिल्हाप्रमुख गौतमजी चाबुकस्वार यांच्या हस्ते करण्यात आले .

कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून शहरप्रमुख संजोग वाघेरे पाटील, माजी नगरसेविका उर्मिला काळभोर, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, माजी नगरसेवक मारुतीराव भापकर, पुणे जिल्हा महिला संपर्कप्रमुख लतिकाताई पाष्टे, पुणे जिल्हा समन्वयक सुशीला पवार, शहर संघटिका रूपालीताई आल्हाट, सामाजिक कार्यकर्ते विशाल यादव, सामाजिक कार्यकर्त्या दीपा महेश काटे ,उपशहर प्रमुख अमोल निकम, सुदाम परब,विजय गुप्ता, अजय लड्डा, निलेश शिंदे, युवा नेते अजय काळभोर, डॉ वैशाली कुलते, वैभवी घोडके, सुषमा शेलार, तस्मिन शेख, योगिनी मोहन, वैशाली काटकर, दीप्ती काळभोर, आयुष निंबाळकर, बाबासाहेब भोंडवे, सतीश मरळ , संतोष पाचपुते, योगिता केके कांबळे, अक्रम शेख ,बाबाजी भोंडवे, शदाब खान, पंकज चोपदार, शिवराज रणनवरे, राजू थोरात, संभाजी सूर्यवंशी, प्रसाद बनसोडे, शुभम वायकर, संदेश जगताप, रोहित सोनवणे, राजीव मेनन ,कार्यक्रमाचे संयोजन सोमनाथ दादा काळभोर ,गोविंदराव शिंदे, ऋषिकेश घोरपडे, कृष्णा माने, किशोर शिंदे, ऋषिकेश कडव यांनी केले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!