spot_img
spot_img
spot_img

निखिल उमाकांत दळवी यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन

शबनम न्यूज , प्रतिनिधी :

पिंपरी चिंचवड शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा सेनेचे शहर उपप्रमुख निखिल उमाकांत दळवी यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन पक्षाचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन आहेर यांच्या हस्ते संपन्न झाले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पिंपरी चिंचवड शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आमदार सचिन आहेर यांच्या नेतृत्वात संपन्न झाली. यावेळी निखिल दळवी यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.

निखिल उमाकांत दळवी हे आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 14 मधून ओबीसी उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्यास तीव्र इच्छुक आहेत. अनेक वर्षापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात ते कार्यरत असून प्रभाग क्रमांक 14 मध्ये त्यांनी पक्षाच्या माध्यमातून तसेच त्यांच्या विठ्ठल प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहे.

या कार्य अहवाल प्रकाशन प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख संजोग वगैरे, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, खेड आळंदी भोसरी जिल्हा संघटिका पूनम ताई पोतले, जिल्हा संघटिका अनिता उतारे, शहर संघटिका रूपालीताई आल्हाट, जिल्हा समन्वयक सुशीला पवार, उपजिल्हाप्रमुख रोमी संधू ,उपजिल्हाप्रमुख हाजी दस्तगीर मणियार, निवडणूक प्रभारी अशोक वाळके, शहर समन्वयक कैलास नेवासकर, युवा सेना अधिकारी चेतन पवार, यांच्या सह वैभवी घोडके, कल्पना शेटे, संतोष म्हात्रे, गौरीताई घंटे, वैशालीताई कुलथे, वैशालीताई काटकर, धनंजय आल्हाट, तुषार नवले, हरेश नखाते, नीलम म्हात्रे आदी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!