spot_img
spot_img
spot_img

‘चिंचवडगांव गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा’ उत्साहात संपन्न

शबनम न्यूज | प्रतिनिधी

‘चिंचवडचा राजा’ श्री.संत ज्ञानेश्वर मित्र मंडळ, चिंचवडगाव यांच्या वतीने आयोजित ‘चिंचवडगांव गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा’ आणि “आई बाप समजून घेतांना” या विषयावरचे प्रेरणादायी व्याख्यान वक्ते – डॉ. वसंत हंकारे सर हा कार्यक्रम उत्साहपूर्ण, भावनिक आणि विचारप्रवर्तक वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला यावेळी अतिशय भावपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाला चिंचवडगावातील विद्यार्थी व पालकांसहित हजारो चिंचवडकर नागरिकांनी हजेरी लावून जबरदस्त प्रतिसाद दिला.
अतिशय भावपूर्ण वातावरणात झालेल्या या कार्यक्रमाचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष अॅड. मोरेश्वर शेडगे यांनी केले.

आजच्या युगात पालक आणि लेकरांमधील संवाद, संवेदना आणि समजूत यांचे नाते अधिक दृढ करण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून झाला. डॉ. हंकारे सरांच्या विचारांनी सर्व उपस्थितांना खोलवर स्पर्श केला ; अनेकांच्या डोळ्यांत पाणी आले, आणि अंतर्मनात आत्मचिंतनाची एक नवी ज्योत प्रज्वलित झाली.

गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करताना त्यांच्या पालकांच्या योगदानालाही सलाम करण्याची संधी मिळाली.

या अर्थपूर्ण सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देणाऱ्या सर्व नागरिकांचे, पालकांचे, विद्यार्थी बांधवांचे आणि आमच्या कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार.

याप्रसंगी , पिं. चिं. भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न बाप्पू काटे, विधान परिषद आमदार उमाताई खापरे, माजी खासदार अमरजी साबळे, चिंचवड विधानसभेच्या माजी आमदार अश्विनीताई लक्ष्मण जगताप, भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते व टाटा मोटर्स कामगार संघटनेचे माजी अध्यक्ष पै.ज्ञानेश्वर शेडगे, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, पाटीलबुवा चिंचवडे, विठ्ठल भोईर, हेमंत डांगे, अजित कुलथे, रवींद्र देशपांडे, राजेश शिरोळे, महेश काका कुलकर्णी, नंदुकाका जेस्ते, विशाल गावडे, योगेश चिंचवडे, कैलास सानप, अमोल वाणी, शाम मिरजकर, अतुल मिरजकर, दीपक गावडे यांसह मंडळाचे उत्सव प्रमुख विठ्ठल सायकर, कार्याध्यक्ष महेशबापू मिरजकर, यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी प्रमोदशेठ बरडिया, अविनाश तिकोने, योगेश मिरजकर, अजिंक्य राऊत, आदित्य मिरजकर, हर्षल मिरजकर, आनंद सायकर, दुर्गेश मिरजकर, अतुल कांबळे आदी मंडळाचे कार्यकर्ते व चिंचवड गावातील सुज्ञ नागरिक, बंधू-भगिनी आणि विद्यार्थी मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!