spot_img
spot_img
spot_img

डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटीने जाहीर केली नवी जागतिक ओळख!

शबनम न्यूज | प्रतिनिधी

ज्ञान प्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटी ही डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटीने निर्माण केलेली नवीन जागतिक ओळख आहे. या नव निर्मिती मागे डॉ. डी. वाय. पाटील सरांचे नाव, डॉ. पी. डी. पाटील साहेब व डॉ. भाग्यश्रीताई पाटील यांचे परीश्रम तर डॉ. सोमनाथ पाटील व डॉ. रोहिणी पाटील यांच्या दृष्टिकोनाचा परिपाक आहे.

डॉ. वाय. पाटील ज्ञान प्रसाद युनिव्हर्सिटी आता नव्या रूपाने नावारूपाला येत आहे. विद्यापीठाचे नाव बदलून ज्ञान प्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटी असे ठेवण्यात आले असून हे विद्यापीठ डॉ. डी. वाय पाटील युनिटेक सोसायटीचा एक घटक आहे. हा बदल उच्च शिक्षण क्षेत्रात जागतिक दृष्टिकोन, नाविन्यपूर्ण व भविष्याभिमूख विचारसरणीकडे वाटचाल करण्याचा एक महत्वपूर्ण टप्पा आहे. विद्यापीठाची ही नवी ओळख सातत्य आणि प्रगती या दोन्हींचे प्रतिक आहे. ज्ञान आणि वि‌द्याा हे या संस्थेचा आत्मा आहेत्र ग्लोबल हा शब्द विद्यापीठाच्या नव्या वचनबद्धतेचे द्योतक आहे. अंतराष्टीय दृष्टीकोन सर्व समावेशक विचार आणि नाविन्यपूर्ण शिक्षणपद्धती यांचा समन्वय साधणारे शिक्षणपर वातावरणनिर्माण करणे हे या विद्यापीठाचे उ‌द्दिष्ट आहे.

विद्यापीठाच्या नवीन नामांतराच्या घोषणेप्रसंगी आदरणीय डॉ. सोमनाथ पाटील म्हणाले “ही बदलाची प्रक्रिया केवळ नामांतरापुर्ती नाही. तर आमच्य ध्येय आणि दिशाचे पुनःस्मरण आहे. ज्ञान प्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटी ज्ञान आणि उदात्त उ‌द्दिष्टांचे मूल्ये कायम राखत आता अधिक व्यापक आणि जागतिक दृष्टिने वि‌द्यार्थ्यांना तयार करेल. आजचे शिक्षण वर्गापूरते मर्यादित न राहता. स्थानिक विचारांना जागतिक संधीशी जोडणारे असावे.”

तर, डॉ. रोहिणी पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी, ज्ञान प्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटी यांनी सांगितले “या विद्यापीठाचा पाया डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटीच्या चार दशकांच्या शैक्षणीक उत्कृष्टतेवर आधारित आहे. ज्ञान प्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटी म्हणून आम्ही आता नव्या दृष्टिकोनासह पुढे जात आहोत. जागतिक क्षितिजाचा विस्तार, शिक्षणात नवकल्पनाचा समावेश आणि उत्कृष्ट नेतृत्व या नव्या दृष्टिकोनासह आम्ही पुढे जाणार आहेत.

जेव्हा भारतातील उच्च शिक्षण क्षेत्र राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत वेगाने बदल होत असताना या धोरणात लवचिकता, बहुविषयक शिक्षण आणि आंतराष्ट्रीय सहकार्य यावर भर देत आम्ही या विद्यापीठाच्या नामांतराचा निर्णय घेतला आहे.

आगामी काळात ज्ञान प्रसाद ग्लोबल विद्यापीठ –

1. संशोधनातून जागतिक पातळीवर ठसा उमटवणे

2. उदयोगांशी सलग्न अभ्यासक्रमांद्वारे नाविण्यपूर्ण व भविल्याभिमुख शिक्षण देणे

3. भारताला जागतिक शिक्षणकेंद्र म्हणून बळकट करणे ही प्रमुख तीन उदिष्ट डोळयासमोर ठेवून काम करेल.

ज्ञान म्हणजेच विद्या आणि प्रसाद म्हणजे विद्येचे अर्पण करणे या मुलभूत मुल्यांवर आधारित शिक्षण हे या विद्यापीठाचे भविल्यकाळातील ध्येय असेल.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!