spot_img
spot_img
spot_img

महानगरपालिका जनसंवाद सभेत नागरिकांच्या ६८ तक्रार वजा सूचना प्राप्त

शबनम न्यूज | प्रतिनिधी

महापालिकेच्या वतीने आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत एकूण ६८ तक्रार वजा सूचना प्राप्त झाल्या आहे.

आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक आणि महापालिका प्रशासन यांच्यात सुसंवाद राखण्यासाठी महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांत महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. त्यानुषंगाने आज ऑक्टोबर महिन्याच्या चौथ्या सोमवारी अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या आठ क्षेत्रीय कार्यालयात आज जनसंवाद सभा पार पडली. यावेळी नेमून दिलेल्या समन्वय अधिकाऱ्यांनी जनसंवाद सभेचे अध्यक्षपद भूषविले.

          आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या क्षेत्रीय कार्यालयात अनुक्रमे ५, १३, ३, १०, ६, १०, २ आणि १९ अशा एकूण  ६८ तक्रारी वजा सूचना नागरिकांनी उपस्थित राहून मांडल्या.

यावेळी नागरिकांनी शहरातील वाहतूक कोंडी, अरुंद रस्ते, अवैद्य पद्धतीने लावलेले बॅनर, लहान मुलांसाठी खेळांचे मैदान, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त, राष्ट्रीय महामार्गावर सणासुदीच्या काळात होणारी वाहतूक कोंडी, प्रत्येक प्रभागातील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती सार्वजनिक  स्वच्छतागृहांची स्वच्छताआदी तक्रार वजा सूचना जनसंवाद सभेत नागरिकांनी उपस्थित राहून मांडल्या.

या उपक्रमामुळे नागरिकांच्या सहभागातून प्रशासन अधिक पारदर्शक व जबाबदार होईल, तसेच शहरातील नागरी सुविधांच्या उन्नतीस गती मिळेल, असा विश्वास महापालिका प्रशासनाने व्यक्त केला.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!