शबनम न्यूज | प्रतिनिधी
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106 व्या जयंती निमित्ताने पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कडून निगडी स्मारकातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना नरेंद्र बनसोडे म्हणाले “अण्णाभाऊ साठे यांनी उपेक्षित, शोषित, पीडित यांच्या आवाजाला क्रांतीची धार मिळवून द्यायचं मौलिक काम केलं. गरिबांचे, कामगारांचे हक्क याबाबत आपल्या वाणीतून भावना व्यक्त करीत त्यांना सन्मानाचे जीवन मिळवून देण्यासाठीचा अण्णाभाऊ साठे यांचा लढा अविस्मरणीय आहे, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये देखील अण्णाभाऊ साठे यांनी मोठे प्रेरणादायक कार्य केले, महाराष्ट्राच्या इतिहासाला वळण देणाऱ्या त्या घटनेमध्ये त्यांचे शाहिरी आणि गीतांमधून व्यक्त केलेले योगदान मोठे आहे”.
या प्रसंगी काँग्रेसचे शहर अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, काँग्रेस सेवा दलाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष पांडुरंग जगताप, विलास सकट, हरीश डोळस, कबीर मोहम्मद, विजय ओवाळ जितेंद्र छाबडा, गौरी नरसिंगे, कृष्णा जाधव, भास्कर नारखेडे, गुंगा क्षीरसागर, विल्यम साळवी, दीपक भंडारी आदी पदाधिकारी उपस्थित होते.



