spot_img
spot_img
spot_img
spot_img

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्व २०२६ ला उत्साहपूर्ण प्रारंभ

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्व २०२६ या कार्यक्रमाचा आज भक्ती-शक्ती चौक, निगडी येथे मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या समता, सामाजिक न्याय, श्रमप्रतिष्ठा आणि परिवर्तनवादी विचारांचा वारसा समाजापर्यंत, विशेषतः युवा पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या या महोत्सवाचे उद्घाटन उपमहापौर शर्मिला बाबर व आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.

आजच्या खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार महेश लांडगे,शंकर जगताप, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, अ प्रभाग अध्यक्षा अर्चना करांडे, नगरसदस्य अनिल घोलप,अनुराधा गोरखे, सुलभा उबाळे, सुप्रिया चांदगुडे, ऐश्वर्या तरस, निलेश तरस, मधुरा शिंदे, उपायुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष गणेश अवघडे, जेजुरी देवस्थानाचे अध्यक्ष अनिल सौंदंडे, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब अडागळे,संजय ससाणे, अरुण जोगदंड,युवराज दाखले,नितीन घोलप, प्रल्हाद सुधारे,सुनिल भिसे,रोहन भिसे,नाना कसबे,सतीश भवाळ,यादव खिलारे,विशाल कसबे,बाळासाहेब रसाळ,शिवाजी साळवे, डी.पी.खंडाळे, नेताजी शिंदे,नामदेवराव रिट्टे,भगवान शिंदे, पोपट आरणे, मारुती जाधव, नरसिंह वैरागर, सुरेश वैरागर, प्रसाद केसरे, अर्चना शिंदे, सुनिता भेंगळे, समिरा राजगुरू, अनिता जगधनेमहिला अध्यक्षा उषाताई कांबळे, कल्पना मोरे-दाखले,अनिशा पवार, संगिता नानेकर, गीता अडागळे, आशा शहाणे, मीना खिलारे, संदीप रोखडे, गणपत जाधव, अरुणा भोसले, तेजस्विनी भोसले, किर्ती जाधव, वंदना जाधव, सचिन लिमकर, विलास गडसिंग, संतोष जाधव, अनंत कुलकर्णी, सतीश रिट्टे तसेच विविध सामाजिक संस्था, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, महिला भगिनी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दि. १ ते ७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत भक्ती-शक्ती चौक, निगडी येथे आयोजित या महोत्सवात सामाजिक प्रबोधनपर व्याख्याने, वैचारिक परिसंवाद, साहित्यिक कार्यक्रम, कवी संमेलन, लोककला सादरीकरणे, संगीत मैफिली, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सनईवादन, पारंपरिक हलगीवादन, बँड स्पर्धा,स्वरचंदन’ गीतगायन, ‘महाराष्ट्राची लोकसंस्कृती’ या सांस्कृतिक कार्यक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या सात दिवसांच्या महोत्सवात विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ, साहित्यिक, विचारवंत, कलावंत आणि लोककलावंत सहभागी होणार असून, सामाजिक प्रबोधनासोबतच महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा अनुभवण्याची संधी नागरिकांना उपलब्ध होणार आहे. महोत्सवातील सर्व कार्यक्रमांसाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

“लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि लोककलेच्या माध्यमातून समाजातील वंचित, शोषित आणि सर्वसामान्यांच्या भावना प्रभावीपणे व्यक्त करत सामाजिक परिवर्तनाची चळवळ उभी केली. समता, बंधुता, सामाजिक न्याय आणि मानवतेचा त्यांनी दिलेला संदेश आजही तितकाच प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचे जतन आणि संवर्धन करण्याबरोबरच नव्या पिढीपर्यंत त्यांचा वैचारिक वारसा पोहोचविणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. या विचार प्रबोधन पर्वाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन, सांस्कृतिक जतन आणि लोकसहभाग अधिक दृढ होईल. नागरिकांनी या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा संदेश समाजात अधिक व्यापक करावा.”
-आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!