spot_img
spot_img
spot_img
spot_img

कपड्यांचा माल विकून ५.५६ लाखांचा अपहार; व्यापाऱ्याची फसवणूक, आरोपी अटकेत

शबनम न्यूज | प्रतिनिधी

कपड्यांचा व्यवसाय सुरू करून देण्याचे आमिष दाखवत विश्वासाने विक्रीसाठी दिलेला रेडिमेड कपड्यांचा माल परस्पर विकून ५ लाख ५६ हजार ८४० रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रच्चित पी. प्रभु छाबडा (वय ३६, रा. इंदोर) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी रवि संबुलाल बठलिया (वय ३९, मूळ रा. रतलाम, मध्यप्रदेश) हा फिर्यादीच्या अजमेरा, पिंपरी येथील दुकानात गेल्या तीन महिन्यांपासून काम करत होता. महाराष्ट्रात चांगली ओळख असल्याचे सांगून कपड्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्याने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर विक्रीसाठी दिलेल्या २,७६० रेडिमेड कपड्यांपैकी २,५२८ कपडे परस्पर विकून त्यातून मिळालेली ५ लाख ५६ हजार ८४० रुपये रक्कम स्वतःकडे ठेवत अपहार केल्याचा आरोप आहे.

याप्रकरणी संत तुकाराम नगर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४) व ३१६(४) अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!