शबनम न्यूज | प्रतिनिधी
उसने दिलेल्या पैशांच्या वादातून एका २७ वर्षीय तरुणावर चाकू व लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला झाल्याची घटना आळंदी-मरकळ रोडवरील कल्चर हॉटेल शेजारील ओढ्यालगत घडली. या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०९(१) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महादेव परमेश्वर काळे (वय २७) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी आर्यन नाना फुलगे (२२) व समाधान प्रकाश फुलगे (२१) यांनी उसने घेतलेल्या पैशांची तात्काळ मागणी केली. फिर्यादीने “१ किंवा २ तारखेला पैसे देतो” असे सांगताच आरोपी संतापले. त्यापैकी एकाने फिर्यादीला पकडून ठेवले, तर दुसऱ्याने लहान चाकूने पोट व मानेवर वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर जवळच पडलेल्या लाकडी दांडक्याने डोक्यात मारहाण करून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
या प्रकरणाचा पुढील तपास आळंदी पोलीस करत आहेत.



