spot_img
spot_img
spot_img
spot_img

पिरंगुट घाटात हिट अँड रन; अज्ञात वाहनाच्या धडकेत ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिरंगुट घाटात भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीस्वाराला पाठीमागून जोरदार धडक देऊन अपघातस्थळावरून पलायन केल्याची घटना घडली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या आशुतोष शर्मा (वय ४०) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (२९ जुलै) रात्री सुमारे १०.२० वाजता आशुतोष शर्मा हे पिरंगुटकडे जात असताना पुण्याकडून भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली. अपघातानंतर चालकाने जखमीला मदत न करता किंवा रुग्णालयात न नेता घटनास्थळावरून पलायन केले. गंभीर दुखापतीमुळे आशुतोष शर्मा यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी बावधन पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), २८१, ३२४(४) तसेच मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमान्वये अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, सीसीटीव्ही आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे वाहनाचा शोध सुरू आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!