शबनम न्यूज | प्रतिनिधी
भोसरीतील छावा चौक परिसरात भरदिवसा पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण ज्ञानेश्वर वैरागर (वय ४८, रा. मोशी) यांनी त्यांची होंडा स्लेंडर प्लस (एमएच १४ एमजे ९५१७) ही सुमारे ४० हजार रुपये किमतीची मोटारसायकल २४ जुलै रोजी दुपारी छावा चौक, फुगे प्राईससमोर, भोसरी पुलाखाली लॉक करून पार्क केली होती. काही वेळाने परत आल्यावर दुचाकी जागेवर नसल्याचे निदर्शनास आले. अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याचे स्पष्ट झाले.
याप्रकरणी भोसरी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे.



