spot_img
spot_img
spot_img
spot_img

“रहस्याचा पडदा अद्याप कायम”, एस एस फिल्म प्रोडक्शन आगामी चित्रपट ठरतोय चर्चेचा विषय

शबनम न्यूज | प्रतिनिधी

मराठी चित्रपटसृष्टीत आणखी एका वेगळ्या आणि आशयघन चित्रपटाची भर पडणार असून, ‘एस एस फिल्म प्रोडक्शन’ एका नव्या मराठी चित्रपटाची निर्मिती करत आहे. अर्थात हा नवा चित्रपट कोणता असणार आहे याची उत्सुकता असून, निर्माते शरद पाटील आणि अंजली पाटील यांनी या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा पेलवली आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची, कथेची धुरा संवेदनशील आणि वैशिष्ट्यपूर्ण मांडणीसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक चेतन चावडा यांनी सांभाळली आहे. तर नितीन चव्हाण हे चित्रपटाचे लेखक आहेत. तर चित्रपटाला सुरेल आणि दमदार संगीताची साथ लाभणार असून, संगीतकार साई–पियुष ही जोडी चित्रपटातील संगीताची जबाबदारी सांभाळत आहेत. या चित्रपटाचे प्रोडक्शनचे काम मेटाएफएक्स कंपनीचे मुकुल नाळे आणि टीम करत आहे.

विशेष म्हणजे, या चित्रपटाचे नाव, कलाकार आणि कथा अद्याप गुप्त ठेवण्यात आली आहे. मात्र निर्मात्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा चित्रपट मराठी प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव देणारा, आशय आणि सादरीकरणाच्या दृष्टीने हटके असणार आहे. त्यामुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
आजच्या मराठी चित्रपटसृष्टीत नवनवीन विषय, तांत्रिक दर्जा आणि दर्जेदार सादरीकरणाला प्रेक्षकांची पसंती मिळत असताना, एस एस फिल्म प्रोडक्शन हा आगामी चित्रपटही त्याच परंपरेत एक वेगळी ओळख निर्माण करेल, असा विश्वास निर्मात्यांकडून व्यक्त केला आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!