spot_img
spot_img
spot_img
spot_img

पिंपरी-चिंचवडच्या नव्या प्रशासकीय मुख्यालयासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनाधिष्ठित पुतळा उभारण्याची मागणी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ऑटो क्लस्टरसमोरील नव्या प्रशासकीय मुख्यालयाच्या इमारतीसमोर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनाधिष्ठित भव्य पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी महापालिका प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

महापौर रवी लांडगे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर तसेच शिवसेनेचे गटनेते विश्वजीत बारणे यांना हे निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापनेपासून महापालिकेच्या मुद्रेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे. त्यामुळे नव्या प्रशासकीय मुख्यालयासमोर महाराजांचा सिंहासनाधिष्ठित भव्य पुतळा उभारण्यास मान्यता देऊन आवश्यक कायदेशीर प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी.

तसेच महापालिकेतील प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या न्यायप्रिय, पारदर्शक, शिस्तबद्ध आणि लोकाभिमुख प्रशासनाच्या आदर्शांनुसार काम करावे. मुख्यालयातील प्रत्येक अधिकृत कार्यक्रमाची सुरुवात महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने व्हावी, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

हा विषय शहराच्या अस्मितेशी आणि ऐतिहासिक वारशाशी निगडित असल्याचे नमूद करत, या कामासाठी प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न करावेत, अशी विनंती मारुती भापकर यांनी केली आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!