spot_img
spot_img
spot_img
spot_img

अल्पसंख्याकांच्या प्रश्नांवर आठवले यांच्यासोबत सकारात्मक चर्चा

शबनम न्यूज | प्रतिनिधी

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांचा मुंबईतील संविधान बंगला येथे अल्पसंख्याक आघाडी, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने पुष्पहार अर्पण करून सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.

अल्पसंख्याक आघाडी, महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस खाजाभाई शेख यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. यावेळी राज्यातील अल्पसंख्याक समाजासमोरील विविध प्रश्न, सामाजिक न्याय, संघटन बळकटीकरण, पक्षविस्तार तसेच जनहिताशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर आणि सकारात्मक चर्चा करण्यात आली.

बैठकीत संविधानातील समानता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या तत्त्वांनुसार समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच अल्पसंख्याक समाजाच्या समस्या शासन स्तरावर मांडून त्यावर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी समन्वयाने काम करण्यावर भर देण्यात आला.

यावेळी हाजी वकार खान, मौलाना रशीद अन्सारी, इरफान शेख, कलाम भाई, असलम शेख, मुबीन अलालखान यांच्यासह अनेक पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!