spot_img
spot_img
spot_img
spot_img

अप्पूघर नव्या रुपात सजणार, चेहरा मोहरा बदलणार ; नगरसेवक प्रमोद कुटे यांच्या पाठपुराव्याला यश

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्यातील मध्यवर्गीय नागरिकांचे पर्यटनाचे आकर्षण असलेले निगडीतील अप्पूघरचा कायापालट होणार आहे. अप्पूघर नव्या रुपात सजणार असून त्याचा चेहरा मोहरा बदलणार आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रमोद कुटे यांनी सर्वसाधारण सभेत आवाज उठवला होता. त्यानंतर प्रशासनाने अप्पूघरचे नुतनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

नगरसेवक प्रमोद कुटे म्हणाले, एकेकाळी पुण्यामध्ये सारसबाग आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अप्पूघर हे सामान्य माध्यमवर्गीय नागरिकांचे फिरण्याचे आवडीचे ठिकाण होते. पिंपरी-चिंचवड शहराचा झपाट्याने विकास, कायापालट होत असताना अप्पूघरची अवस्था मात्र अत्यंत दयनीय झाली आहे. अप्पूघर हे सर्वसामान्यांसाठी पर्यटनाचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. सध्याच्या महागड्या अम्युझमेंट पार्क्सच्या तुलनेत अप्पू घराचे तिकीट दर अत्यंत कमी आहेत. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी विशेष बदल झाले नव्हते. आता तेथील राईड्स आणि सुखसोयींचे आधुनिकीकरण करणे आवश्यक आहे.

यासाठी महापालिका सर्वसाधारण सभेत सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. त्यानुसार अप्पू घरासाठी २०३१ पर्यंत संबंधित कंत्राटदाराबरोबर करार करण्यात आला आहे. यामध्ये वॉटर पार्क आणि इतर नाविन्यपूर्ण प्रकल्पांचा समावेश केला आहे. त्यामुळे अप्पूघर नव्या रुपात सजणार असून त्याचा चेहरा मोहरा बदलणार आहे. शहरातील अत्यंत लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेल्या ‘अप्पू घरा’चा लवकरच कायापालट होणार आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!