spot_img
spot_img
spot_img

महाराष्ट्र दिनानिमित्त विद्यार्थिनींनी केले मध्य रात्री वृक्षारोपण

शबनम न्यूज | प्रतिनिधी

ब्रह्मसिंह गुरुकुल (४) या शाळेतील, अवंती पांडे , द्रुती सोनावणे , रेवा आव्हाड, श्वेता लिमन तसेच
गुरुवर्य अकॅडेमी स्कूल (१) मधील ध्रुविता चव्हाण या ५ विद्यार्थीनींनी पीसीएमसीमधील ४ वेगवेगळ्या टेकड्यांवर वृक्षारोपण केले. सर्व टेकड्या सायकलिंगने (५० किमी) पार केल्या. यामध्ये दख्खन टेकडी, फॉरेस्ट हिल, घोराडेश्वर, गणेश टेकडी या टेकड्यांचा समावेश होता . या टेकड्या सायकलने चढण्यास रात्री १०:३० वाजता सुरुवात झाली आणि सकाळी ६:३० वाजता संपली . या सर्व टेकड्या मध्यरात्रीपर्यंत पार केल्या. यासाठी श्री. प्रफुल्ल प्रधान यांनी प्रशिक्षण दिले व सौ. ज्योत्स्ना मॅडम व श्री. भूषण सर यांनी मार्गदर्शन केले.
वृक्षारोपण (झाडे लावणे) हे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी, हवा शुद्ध करण्यासाठी आणि ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. झाडे लावा, झाडे जगवा, या धरतीला स्वर्ग बनवा!

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!