spot_img
spot_img
spot_img

दिघी परिसरात सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य; महिलेविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा

प्रतिनिधी – युनूस खतीब

पिंपरी-चिंचवड- दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथे सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २ मे २०२६ रोजी दुपारी सुमारे ३.३० वाजण्याच्या सुमारास दिघी ते आळंदी सर्व्हिस रोडवरील गंधर्व लॉजसमोर हा प्रकार घडला. याबाबत त्याच दिवशी सायंकाळी ४.२० वाजता गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलीस शिपाई सोमनाथ बाळू खळसोडे (वय ३५) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, संबंधित महिला आरोपीने सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव करून तसेच अश्लील शब्द उच्चारून फिर्यादी व इतर नागरिकांशी गैरवर्तन केले. तसेच अंगावर हात फिरवत जाणाऱ्या-येणाऱ्या व्यक्तींना अडथळा निर्माण होईल असे वर्तन केल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या कृत्यामुळे सार्वजनिक सभ्यतेचा भंग झाल्याने आरोपी महिलेविरुद्ध अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम १९५६ च्या कलम ८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, संबंधित महिला आरोपी अद्याप फरार असून तिचा शोध सुरू आहे.

या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!