spot_img
spot_img
spot_img

दक्षिण महाळुंगे एमआयडीसी हद्दीत तीन वर्षीय बालकाची निर्घृण हत्या; १२ तासांत अल्पवयीन आरोपी ताब्यात

लैंगिक अत्याचारानंतर गळा चिरून खून; पुणे रेल्वे स्टेशन परिसरातून आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश

प्रतिनिधी – युनूस खतीब

पिंपरी-चिंचवड – दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या अत्यंत धक्कादायक घटनेत तीन वर्षीय बालकावर लैंगिक अत्याचार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी अवघ्या १२ तासांत ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १ मे २०२६ रोजी संबंधित बालक घरासमोर खेळत असताना अचानक बेपत्ता झाला. पालकांनी परिसरात शोध घेतल्यानंतर पोलिसांकडे तक्रार नोंदविण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम हाती घेतली असता शेजारील खोलीत एका बॅगेत सदर बालकाचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक तपासात बालकावर लैंगिक अत्याचार करून अत्यंत क्रूरपणे गळा चिरून हत्या केल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१), २३८ तसेच पोक्सो कायदा कलम ४ व ६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवली. घटनास्थळाचे बारकाईने निरीक्षण, सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे संशयिताचा माग काढण्यात आला.

तपासादरम्यान आरोपी हा बिहार राज्यातील रहिवासी असून अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सापळा रचून आरोपी बिहारला पळून जाण्याच्या तयारीत असताना पुणे रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला विधीसंघर्षग्रस्त बालक म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पोलीस उप आयुक्त श्वेता खेडकर तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ व पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल देवडे यांच्या पथकाने पार पाडली.

सदर घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल देवडे करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!