spot_img
spot_img
spot_img

दापोडीत बेकायदेशीर दारू साठा उघड; १६ हजारांच्या प्रोव्हिबिशन मालासह आरोपीवर गुन्हा

महात्मा फुलेनगर झोपडपट्टीत कारवाई; आरोपी फरार, पोलिसांचा शोध सुरू

प्रतिनिधी – युनूस खतीब

पिंपरी-चिंचवड – दापोडी परिसरातील महात्मा फुलेनगर झोपडपट्टी येथे बेकायदेशीररीत्या दारू साठा ठेवून विक्रीसाठी तयारी केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १ मे २०२६ रोजी रात्री सुमारे ८.१५ वाजण्याच्या सुमारास घर क्रमांक १४५ च्या शेजारी बंद शटरसमोरील मोकळ्या जागेत हा प्रकार आढळून आला. याबाबत दि. २ मे २०२६ रोजी पहाटे १२.१६ वाजता गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या प्रकरणी निखील बाळासाहेब वर्षे (वय ३४), पोलीस शिपाई, अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंपरी-चिंचवड यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, आरोपी किरण काशीनाथ सूर्यवंशी (वय ३२, व्यवसाय – सफाई कामगार, रा. महात्मा फुलेनगर झोपडपट्टी, दापोडी) याने सुमारे १६ हजार १९५ रुपये किमतीचा प्रोव्हिबिशनचा दारू साठा अनधिकृतपणे व परवान्याशिवाय विक्रीसाठी ठेवला होता.

याप्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

या कारवाईत पोलीस हवालदार पाटील यांनी पुढाकार घेतला असून, पुढील तपास सुरू आहे. परिसरात अशा बेकायदेशीर धंद्यांविरोधात पोलीसांनी कारवाई तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!