spot_img
spot_img
spot_img

हिंजवडी परिसरात डॉक्टरच्या प्लॉटमधील ऑफिस कंटेनर जबरदस्तीने नेल्याचा आरोप; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

कासारसाई येथे प्रकार; शिवीगाळ व अतिक्रमणाची धमकी – पोलिस तपास सुरू

प्रतिनिधी – युनूस खतीब

मुळशी  – हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कासारसाई येथे डॉक्टरच्या मालकीच्या प्लॉटमधील लोखंडी ऑफिस कंटेनर जबरदस्तीने घेऊन गेल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार दि. १० ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास मौजे कासारसाई, सर्व्हे नं. १९/१, ता. मुळशी, जि. पुणे येथे घडला. याबाबत दि. २ मे २०२६ रोजी सायंकाळी ६.१५ वाजता गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याप्रकरणी फिर्यादी डॉ. पंकज पोपटराव येवले (वय ५३, व्यवसाय – डॉक्टर, रा. गंगाई निवास, अमृतवेल कॉलनी, रहाटणी, पुणे) यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, आरोपी आनंद लाटे, मधुकर बावकर तसेच एका क्रेन चालकासह क्रेनवरील कामगार यांनी संगनमत करून त्यांच्या प्लॉटमधील अंदाजे १ लाख २५ हजार रुपये किंमतीचा लोखंडी ऑफिस कंटेनर जबरदस्तीने नेला.

यावेळी आरोपींनी फिर्यादीची संमती न घेता शिवीगाळ केली तसेच कंपाउंडची भिंत पाडून अतिक्रमण करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४), ३५२, ३५१ (२), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक साळी करीत आहेत.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!