spot_img
spot_img
spot_img

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबरला आरक्षण सोडत

शबनम न्यूज | प्रतिनिधी

राज्यातील ३२ जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या ३३६ पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता सदस्यपदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी १३ ऑक्टोबर रोजी सोडत काढण्यात येणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे.

संबंधित जिल्हाधिकारी १० ऑक्टोबर रोजी वृत्तपत्रांत आरक्षण सोडतीसंदर्भातील सूचना प्रसिद्ध करतील. १३ ऑक्टोबर रोजी सोडत काढल्यानंतर प्रारूप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. त्यावर १४ ते १७ऑक्टोबर या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील. प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून ३ नोव्हेंबर रोजी शासन राजपत्रात अंतिम आरक्षण प्रसिद्ध केले जाईल.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!