spot_img
spot_img
spot_img

घरखर्चासाठी पैसे देत नसल्याच्या कारणावरून विवाहितेला मारहाण; पतीविरुद्ध गुन्हा

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी : घरखर्चासाठी पैसे देत नसल्याच्या कारणावरून पतीने पत्नीला हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना मोशी परिसरात घडली आहे. एवढेच नव्हे, तर हेल्मेटने पत्नीच्या डोक्यावर आणि घरातील ब्लूटूथ स्पीकरने तोंडावर मारून तिला जखमी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या पत्नीच्या आजीलाही आरोपीने शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणी पीडित महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपीचे नाव राहुल दत्तात्रय लष्कर (वय २९, मूळ गाव चक्करबर्डी, सूरत बायपास हायवे, हिंद कॉंक्रिटजवळ, ता. जि. धुळे) असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे ६.३० वाजण्याच्या सुमारास मोशी येथील देहू-आळंदी रस्त्यावरील कमलराज दत्त विहार सोसायटी, ई-४०४, रोहिदास बांबळे यांच्या घरामध्ये ही घटना घडली.

आरोपी राहुल लष्कर याने घराच्या खर्चासाठी पैसे देत नसल्याच्या कारणावरून पत्नीशी वाद घातला. या वादातून त्याने पत्नीला हाताने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर घरातील हेल्मेट पत्नीच्या डोक्यात मारले. तसेच ब्लूटूथ स्पीकरने तिच्या तोंडावर मारून तिला जखमी केले. दरम्यान, घरातील भांडणाचा आवाज ऐकून पत्नीची आजी मैनाबाई भांडण सोडविण्यासाठी तेथे आली. मात्र, आरोपीने त्यांनाही शिवीगाळ केली आणि धक्काबुक्की करून त्यांचा पिरगळला, असे फिर्यादीत म्हटले आहे.

या घटनेमुळे कौटुंबिक वादातून महिलांवरील हिंसाचाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पत्नीला मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी राहुल दत्तात्रय लष्कर याच्याविरुद्ध एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!