0 ते 16 वयोगटातील मुलांनी याचा लाभ घ्यावा सरिता साने यांचे आवाहन
सरिता साने सखी मंच व वेद स्पर्श आयुर्वेदिक क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड मधील वयोगट 0 ते 16 वर्ष असलेल्या मुलांसाठी सुवर्णप्राशन चा पहिला डोस सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येत आहे
या सुवर्णप्राशनचे फायदे रोगप्रतिकार क्षमता वाढवणे, स्मरणशक्ती व एकाग्रता वाढवणे तसेच वजन व उंची वाढण्यास मदत करणे व जंतुनाशक असे अनेक फायदे या सुवर्णप्राशन मुळे मुलांना मिळतात. दिनांक 15 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर वेळ सकाळी 11 ते 6 या वेळेत सौ. सरिता साने यांचे जनसंपर्क कार्यालय साने चेंबर , निगडी प्राधिकरण, सत्यम ज्वेलर्स च्या बाजूला या ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. तरी आकुर्डी , निगडी प्राधिकरण परिसरातील मुलांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सौ. सरिता साने यांनी केले आहे.