spot_img
spot_img
spot_img

थोर क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन….

तीन दिवसांच्या प्रबोधन पर्वाच्या माध्यमातून होणार महापुरुषांच्या विचारांचा जागर…उपमहापौर शर्मिला बाबर यांनी केले उद्घाटन…

पिंपरी, दि. १४ नोव्हेंबर २०२६ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने थोर क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस व पुतळ्यास उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
अभिवादनाच्या वेळी आमदार अमित गोरखे,विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नगरसेविका अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,जेजुरी संस्थानचे मुख्य विश्वस्त अनिल सौंदंडे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते नाना कांबळे, भाऊसाहेब अडागळे, संदीपान झोंबाडे, संजय धुतडमल,युवराज दाखले,भगवान शिंदे, संजय ससाणे, युवराज दाखले, उत्तम सकटे ,मारुती सोनटक्के,आशा शहाणे, सतीश भवाळ, बाळासाहेब रसाळ, संदीप जाधव,सुनिल भिसे, विशाल कसबे, बाळासाहेब खंदारे, वैशाली जाधव,भारती चांदणे, आशाताई शहाणे, केशरताई लांडगे,गणेश कलवले, शिवाजी खडसे, सुहास यादव,अनिकेत साळवे,हरिमान खवळे, भाऊ कसबे,झुंबरताई लांडगे,उषामाई वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.दरम्यान भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्यासह विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी महापुरुषांच्या विचारांचा जागर करणारा लहुजी वस्ताद साळवे तीन दिवसीय विचार प्रबोधन पर्वाचे उद्घाटन उपमहापौर शर्मिला बाबर यांनी केले.
प्रबोधन गीतांच्या सादरीकरणातून महापुरुषांचे कार्य, त्यांचे विचार आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश प्रभावीपणे मांडण्यात येणार आहेत. महापुरुषांच्या विचारांचे स्मरण करून त्यांचे प्रेरणादायी विचार समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!