पिंपरी : ‘स्टोरी आधी सांगू नका’ आणि शांत बसण्याची विनंती केल्यामुळे चित्रपटगृहात एका तरुणाला मारहाण केल्याची घटना चिंचवड येथील एका थिएटरमध्ये घडली. या प्रकरणात २९ वर्षीय तरुणाने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पत्नी आणि बहिणीसोबत चित्रपट पाहत असताना, त्याच्या मागील आसनावर बसलेल्या आरोपीला त्याने ‘स्टोरी आधी सांगू नका’ आणि ‘शांत बसा’ अशी विनंती केली. यामुळे चिडून आरोपीने फिर्यादीची कॉलर पकडून त्याला मारहाण केली आणि खाली पाडले. आरोपीने त्याला लाथा-बुक्क्यांनी मारले, ज्यामुळे त्याच्या डाव्या हाताला, चेहऱ्याला आणि पोटाला दुखापत झाली. फिर्यादीची पत्नी भांडण सोडवण्यासाठी पुढे आली, तेव्हा आरोपी आणि त्याच्या पत्नीने तिलाही मारहाण केली आणि दोघांना शिवीगाळ केली. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.




Total Users : 239423