spot_img
spot_img
spot_img

प्रसन्न डांगे यांच्या वतीने घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा

शबनम न्यूज | प्रतिनिधी

आपला महाराष्ट्र हा अनेक परंपराने सजलेला महाराष्ट्र आहे. सध्या सणसमारंभाचे दिवस मोठ्या उत्साहात साजरे होत आहेत. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर’, या असे आपण दरवर्षी म्हणत असतो, याच विघ्नहर्ता गणरायाचे आगमन यंदा 27 ऑगस्ट रोजी होत आहे.

या निमित्ताने पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रसन्न डांगे यांच्या वतीने घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. या स्पर्धेमध्ये जिंकून येणाऱ्या स्पर्धकास प्रथम पारितोषिक म्हणून एक्टिवा-टू व्हीलर देण्यात येणार आहे. तसेच दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस वॉशिंग मशीन असून तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस एलईडी टीव्ही देण्यात येणार आहे, तरी जास्तीत जास्त चिंचवड गावातील नागरिकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन प्रसन्न डांगे यांनी केले आहे.

या स्पर्धेत भाग घेण्यासाठी गौरी गणपती सजावट ही पूर्णपणे आपल्या घरी करणे आवश्यक आहे. तसेच आयोजक या सजावटीची पाहणी करण्यासाठी आपल्या घरी भेट देतील, या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी स्पर्धकांनी प्रसन्न डांगे यांच्या जनसंपर्क कार्यालयात, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरा जवळ, गावडे भोईर, आळी चिंचवडगाव येथे नाव नोंदणी करावी,असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!