spot_img
spot_img
spot_img

कीर्तीताई मारुती जाधव युथ फाऊंडेशनच्या पाठपुराव्याने घरकुल परिसरात सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहरातील स्पाईन रस्त्यावर घरकुल परिसरातील घरकुल चौक स्तंभ सुशोभीकरण देखभाल दुरुस्ती अंतिम टप्प्यात आली आहे.

स्पाईन रस्त्यावर असलेल्या घरकुलच्या मुख्य चौकाची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. चौकात तयार करण्यात आलेल्या सुशोभीकरण गार्डनची पूर्णपणे दुर्दशा झाली होती. सदर गार्डनची दुर्दशा व स्तंभाचे सुशोभीकरण लवकरात लवकर व्हावे, यासाठी भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनात कीर्तीताई मारुती जाधव युथ फाऊंडेशन वतीने याबाबत पाठपुरावा करण्यात आला.

उद्यान विभागाचे प्रमुख राजेश वसावे व नंदकुमार ढवसळकर यांच्या निदर्शनास आणून दिले. संबंधित अधिकाऱ्यांनी चौकाची पाहणी करून सदर सुशोभीकरण व्यवस्थित करून देण्याचे आश्वासन दिले व तत्परतेने त्या आदेशाचे पालन करत सदर चौकातील सुशोभीकरण अंतिम टप्प्यात आली आहे. पूर्णपणे चौकातील सुशोभीकरण व्यवस्थित झाल्यामुळे पूर्णा नगर, शिवतेज नगर व घरकुल मधील सर्व रहिवासी नागरिकांनी आभार व्यक्त केले आहे. सर्व सुशोभीकरण कामाची पाहणी अधिकाऱ्यांसमवेत नंदकुमार ढवसळकर यांच्यासह मारुती जाधव, ऋषिकेश जाधव, विशाल गरड, प्रसाद ढमढेरे,अभी जाधव, दीपक मोतेवाड, दत्तात्रय धरमे, कुणाल पळसकर, सेफ खान, आदी मान्यवर यावेळी हजर होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!