spot_img
spot_img
spot_img

अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त माजी उपमहापौर मोहम्मद भाई पानसरे यांच्यावतीने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

पिंपरी चिंचवड : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविले गेले यामध्ये प्रामुख्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी उपमहापौर मोहम्मद भाई पानसरे व माजी नगरसेविका अमिना चाची पानसरे यांच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.

सदर वृक्षारोपण कार्यक्रम एच.ए. शाळेच्या मैदानात करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक,एकनाथ भुरसे सर, शाळेचे पदाधिकारी सरचिटणीस, विजय पाटील, गोपीनाथ शेळके, बाळासाहेब जाधव, पंडित पवार, उमेश कुलकर्णी, संपत पाचुणकर रमेश गडवे शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्व मान्यवरांनी तसेच माजी उपमहापौर मोहम्मद भाई पानसरे व अमीना चाची पानसरे यांनी आपापल्या मनोगताद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!