spot_img
spot_img
spot_img

गिनीज विश्वविक्रमाची नोंद करणारी ‘इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉन’ २९ नोव्हेंबरला मोशीत!

शबनम न्यूज | प्रतिनिधी

सायकलींची सर्वांत लांब रांग उभारून २०२३ मध्ये गिनीज विश्वविक्रम नोंदविणाऱ्या ‘इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉन’चे यंदाचे आयोजन रविवार, दि. २९ नोव्हेंबर २०२६ रोजी मोशी येथे करण्यात आले आहे. आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाची यंदाची रॅली सकाळी ६ वाजता हिंदुभूषण छत्रपती संभाजी महाराज स्मारकाजवळील पीआयईसीसी मैदानावरून (PIECC Ground) सुरू होणार आहे. सहभाग मोफत असून नोंदणीला सुरुवात झाली आहे.

इंद्रायणी नदीची स्वच्छता आणि संवर्धनाचा संदेश देण्यासाठी सुरू झालेल्या या उपक्रमाला यापूर्वीही मोठा प्रतिसाद मिळाला आहे. २०२३ मध्ये सायक्लोथॉनच्या टीमने जर्मनीचा तत्कालीन विक्रम मोडून ‘Longest Line of Bicycles (Static)’ या प्रकारात गिनीज विश्वविक्रम नोंदवला. त्या वर्षीच्या सायकल रॅलीत ३० हजारांहून अधिक सायकलस्वार सहभागी झाले होते. Pune

तसेच, २३ नोव्हेंबर २०२५ रोजी मोशी येथे झालेल्या सायक्लोथॉनमध्ये ५१ हजार ३०० हून अधिक सायकलस्वार सहभागी झाले होते, तर कार्यक्रमाला सुमारे ७९ हजार नागरिकांची एकूण उपस्थिती होती. यावर्षी आतापर्यंतचे रेकॉर्ड मोडीत काढण्याचा संकल्प आयोजकांनी केला आहे.
**

यंदा ५ आणि २५ किलोमीटरचे दोन पर्याय
सहभागींना आपल्या क्षमतेनुसार ५ किंवा २५ किलोमीटर अंतर निवडता येईल. प्रत्येक सहभागीला टी-शर्ट, सहभागाचे पदक आणि अल्पोपाहार देण्यात येणार आहे. इच्छुकांनी अधिकृत पोस्टरवरील QR कोड स्कॅन करून मोफत नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या उपक्रमाच्या आयोजनात आणि सहकार्यात अविरत श्रमदान, सायकल मित्र, महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांचा सहभाग आहे. अधिक माहितीसाठी  99226 85487 या क्रमांकावर संपर्क करावा. ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी https://maheshklandge.com/rivercyclothon/ लिंकवर भेट द्या.

“२०२३ मध्ये पिंपरी-चिंचवडच्या सायक्लोथॉनची गिनीज विश्वविक्रमात नोंद झाली. त्या लोकसहभागाच्या बळावर यंदा पाणी बचतीचा संदेश अधिकाधिक घरांपर्यंत पोहोचवायचा आहे. आपल्या क्षमतेनुसार ५ किंवा २५ किलोमीटरचे अंतर निवडा, मोफत नोंदणी करा आणि २९ नोव्हेंबरला मोशीमध्ये इंद्रायणीसाठी सायकल चालवूया.”

– महेश लांडगे, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

“इंद्रायणीच्या संवर्धनासाठी वर्षभर नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. घरात पाणी जपून वापरणे आणि नदीत कचरा जाणार नाही याची काळजी घेणे, या गोष्टी प्रत्येक जण आजपासून करू शकतो. सायक्लोथॉनमधून हा संदेश आपल्या कुटुंबापर्यंत आणि परिसरापर्यंत नेऊया.”

  • डॉ. निलेश लोंढे, प्रमुख, अविरत श्रमदान.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!