पिंपरी-चिंचवड : शहरातील थेरगाव, डांगे चौक परिसरात नव्याने सुरू झालेल्या ‘D’ATHENA’ या रेस्टॉरंटचा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते तथा मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर आणि माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्या शुभहस्ते रेस्टॉरंटचे उद्घाटन करण्यात आले.
उत्कृष्ट भोजन, दर्जेदार सेवा आणि ग्राहकांच्या समाधानाला प्राधान्य देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेले हे रेस्टॉरंट आता नागरिकांच्या सेवेत दाखल झाले आहे.
माजी नगरसेवक सतीशदादा दरेकर आणि त्यांचे सुपुत्र अभिजित दरेकर यांनी या नव्या व्यावसायिक उपक्रमाची सुरुवात केली आहे. त्यांच्या या नव्या वाटचालीचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले तसेच व्यवसायाच्या भरभराटीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या उद्घाटन सोहळ्याला नगरसेवक शेखर चिंचवडे, नगरसेविका शालिनीताई गुजर, सामाजिक कार्यकर्ते सारंग कामठेकर, शिवसेनेचे बाळासाहेब वाल्हेकर, नगरसेविका सीमाताई सावळे, नगरसेवक राजेंद्र जगताप ,भाजप नेते सचिन साठे , हरिभाऊ तिकोने, प्रवीण कुदळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, पत्रकार, दरेकर कुटुंबीय, मित्रपरिवार व स्नेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यामुळे दरेकर कुटुंबीयांच्या नव्या व्यावसायिक पर्वाला उत्साहात सुरुवात झाली.





Total Users : 238509