spot_img
spot_img
spot_img

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सवलतीत वाहन प्रशिक्षण’

शबनम न्यूज | प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याचे व मुख्यमंत्री तथा पुणे व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील वेदांत मोटर ड्राइविंग स्कूल वतीने पिंपरी चिंचवड शहरवासीयांकरिता सवलतीमध्ये वाहन प्रशिक्षण सोबतच वाहन परवाना देण्यात येणार आहे.

सदर उपक्रम अंतर्गत 16 जुलै ते 31 जुलै पर्यंत प्रवेश सुरू राहणार आहे.

या उपक्रमा अंतर्गत महिलांसाठी खास टू व्हीलर लायसन्स मोफत देण्यात येणार आहे. या उपक्रमात अनुभवी ड्रायव्हर मार्फत ट्रेनिंग दिली जाणार आहे. तसेच महिलांसाठी स्वतंत्र बॅच उपलब्ध आहे. या उपक्रमात सहभागी होणाऱ्यांना शंभर टक्के वाहन चालवणे शिकविले जाणार आहे. याचबरोबर या उपक्रमात टायर बदलणे, घाटावर गाडी चालवणे याचेही प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त इच्छुक नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाहतूक सेलचे अध्यक्ष विनोद वरखडे पाटील यांनी केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!