spot_img
spot_img
spot_img

पुण्यात पोलीस कर्मचार्‍याने उकळली २८ हजारांची खंडणी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पुण्यातील बापदेव घाटात एक तरुण मित्रा सोबत फिरण्यास गेला होता.त्यावेळी त्या तरुणाच्या बॅगेत हुक्का पॉट आढळल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्याच्या धमकीने पोलीस कर्मचाऱ्याने 28 हजार रुपयांची खंडणी उकळल्याची घटना घडली.

या प्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये विक्रम लक्ष्मण वडतीले असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिसाचे नाव आहे.पोलीस कर्मचार्‍यावर गुन्हा दाखल होताच पोलिस खात्यातून निलंबित करण्यात आले आहे. या घटनेमुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,तक्रारदार तरुण हा चेन्नईतील राहणारा असून तो त्याच्या मित्रासह बोपदेव घाट परिसरात फिरण्यासाठी गेला होता.त्यावेळी त्याच्या बॅगेत हुक्का पॉट सापडला. त्यावेळी पोलीस कर्मचारी विक्रम वडतीलेने तरुणाला कारवाई करण्याच्या धमकीने सुरुवातीला 30 हजार रूपयांची मागणी केली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!