spot_img
spot_img
spot_img

पिंपळे सौदागर,पी. के. चौकातील वाहतूक कोंडीवर तोडग्यासाठी ६३ कोटी ५६ लाख लाखांची निविदा प्रसिद्ध; नाना काटे यांच्या मागणीला यश

नाशिक फाटा-वाकड बीआरटीएस मार्गावरील VUP अंडरपास उभारणीच्या दिशेने महापालिकेचे पाऊल

पिंपरी-चिंचवड : रहाटणी-पिंपळे सौदागर परिसरातील नाशिक फाटा ते वाकड बीआरटीएस मार्गावरील पी. के. चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महापालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या ठिकाणी VUP (व्हेईकल अंडरपास) उभारण्यासाठी तब्बल ६३ कोटी ५६ लाख रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.

पी. के. चौकातील सततच्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. हिंजवडी, वाकड आणि पुणे शहराकडे जाणाऱ्या वाहनांसह भोसरी, चाकण आणि खेड औद्योगिक परिसरातून येणाऱ्या अवजड वाहनांमुळे या चौकात वाहतुकीचा ताण वाढला आहे. परिणामी, वारंवार वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या घटना घडत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता.

या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल (नाना ) काटे यांनी २ जानेवारी २०२५ रोजी महापालिका आयुक्तांकडे निवेदन देत पी. के. चौकात VUP अंडरपास उभारण्याची मागणी केली होती.

आता या कामासाठी ६३ कोटी ५६ लाख रुपयांची निविदा प्रसिद्ध झाल्याने नाना काटे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाल्याचे मानले जात आहे. निविदा प्रक्रियेनंतर प्रत्यक्ष कामाला कधी सुरुवात होणार आणि हा अंडरपास किती कालावधीत पूर्ण होणार, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!