spot_img
spot_img
spot_img

राजेंद्र तरस यांचा वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून दुष्काळग्रस्तांसाठी ५ लाख ५५ हजारांचा मदतीचा हात!

युवा नेते राजेंद्र तरस यांचा सामाजिक बांधिलकीचा आदर्श; नगरसेविका ऐश्वर्या तरस यांच्यावतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धनादेश सुपूर्त

शबनम न्यूज | प्रतिनिधी

वाढदिवस म्हटले की जल्लोष, सत्कार आणि विविध कार्यक्रमांवर होणारा खर्च, असे चित्र सर्वसाधारणपणे पाहायला मिळते. मात्र, युवा नेते राजेंद्र बाळासाहेब तरस यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देत दुष्काळग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी तब्बल ५ लाख ५५ हजार ५५५ रुपयांचा निधी देण्यात आला. वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

नगरसेविका सौ. ऐश्वर्या राजेंद्र तरस यांच्या वतीने, मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेना गटनेते विश्वजीत श्रीरंग बारणे यांच्या सहकार्याने हा निधी जमा करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांच्या मदतीसाठी ५,५५,५५५ रुपयांचा धनादेश सुपूर्त करण्यात आला.

युवा नेते राजेंद्र तरस यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी होणारा अनावश्यक खर्च टाळून तोच पैसा संकटात सापडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. दुष्काळामुळे अनेक कुटुंबांना पाणीटंचाई आणि आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अशा कठीण परिस्थितीत गरजू नागरिकांना मदतीचा हात देणे हेच खऱ्या अर्थाने वाढदिवसाचे सार्थक असल्याची भावना या उपक्रमामागे आहे.

लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना केवळ पद, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी महत्त्वाची नसून समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, ही जाणीव असणे अधिक महत्त्वाचे आहे. आपल्या आनंदात गरजू आणि संकटग्रस्त नागरिकांचाही वाटा असावा, या भावनेतून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.

वाढदिवस साजरा करण्यापेक्षा एखाद्याच्या आयुष्यात आनंद निर्माण करणे महत्त्वाचे आहे. दुष्काळग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी खारीचा वाटा उचलता आला, याचे मनापासून समाधान आहे. समाजसेवेचा हा प्रवास यापुढेही असाच सुरू राहील, अशी भावना नगरसेविका ऐश्वर्या तरस यांच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

वाढदिवसाच्या निमित्ताने होणाऱ्या खर्चाला सामाजिक कार्याची जोड देत दुष्काळग्रस्तांसाठी केलेली ही आर्थिक मदत इतर लोकप्रतिनिधी आणि राजकीय कार्यकर्त्यांसाठीही प्रेरणादायी ठरणारी आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!