spot_img
spot_img
spot_img

लोक जनशक्ती पार्टीचा पिंपरी-चिंचवडमध्ये वर्धापन दिन उत्साहात साजरा

शबनम न्यूज | प्रतिनिधी

 लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) च्या पिंपरी-चिंचवड शहर शाखेच्या वतीने पक्षाचा वर्धापन दिन विविध सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजाला दिलेला समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा संदेश यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी अधोरेखित केला. त्यानंतर लोक जनशक्ती पार्टीचे संस्थापक अध्यक्ष, दिवंगत माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. रामविलास पासवान यांचे विचार, ध्येय-धोरणे, पक्षनिष्ठा आणि प्रामाणिकपणा प्रत्येक कार्यकर्त्याने अंगीकारून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना शहराध्यक्ष सुंदर कांबळे यांनी पिंपरी-चिंचवड शहरात लवकरच लोक जनशक्ती पार्टीच्या भव्य शाखेचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांची शहरात भव्य सभा आयोजित करण्याचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रमोद कुदळे यांना लवकरच निवेदन देण्यात येणार असल्याचेही कांबळे यांनी सांगितले.

वर्धापन दिनाचे औचित्य साधून शहरातील गरजू नागरिकांना अन्नदान करण्यात आले. तसेच केक कापून आणि मिठाई वाटप करून कार्यकर्त्यांनी वर्धापन दिनाचा आनंद साजरा केला. यावेळी शहराध्यक्ष आयुष्मान सुंदर कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रसाद गायसमुद्रे यांची भोसरी विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांना नियुक्तीचे प्रमाणपत्र देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

या कार्यक्रमाला पिंपरी-चिंचवड संघटक नसीम भाई शेख, भोसरी विधानसभा महिला अध्यक्ष सायरा बानू शेख, समीना शेख, प्रभाग क्रमांक २१ महिला अध्यक्ष ममता पवार, सविताताई लाहोरी, वाहतूक आघाडीचे राजाभाऊ धिमधिमे, आनंद भाकरे, जावेद भाई शेख, मारुती काळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला उपाध्यक्ष वृषाली कदम यांनी केले, तर पक्षाचे उपाध्यक्ष अमित कुमार आर्य यांनी आभार मानले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!