spot_img
spot_img
spot_img

भाजपा नगरसेविका योगिता नागरगोजे यांच्या पुढाकारातून ४०० कुटुंबांना मदत

शबनम न्यूज | प्रतिनिधी

खेड तालुक्यातील डेहणे आणि नायफड येथील एकूण ४०० गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. भाजप नेते तथा आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या ‘एक हात मदतीचा… माणुसकीच्या नात्याचा!’ या उपक्रमात नगरसेविका योगिता नागरगोजे यांनी सहकाऱ्यांसह पुढाकार घेतला.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवसाच्या शुभेच्छांना लोकसेवेची जोड देण्याचे आवाहन आमदार लांडगे यांनी केले होते. त्यातून दुष्काळग्रस्त भागातील ५१ गावांमधील गरजू कुटुंबांपर्यंत मदत पोहोचविण्याचा संकल्प करण्यात आला. या व्यापक उपक्रमाचा भाग म्हणून नागरगोजे यांनी डेहणे आणि नायफड येथील कुटुंबांना दैनंदिन गरजांसाठी आधार देण्यावर भर दिला. दोन्ही गावांमध्ये मिळून ४०० मदत किटचे वाटप करण्यात आले.

‘समाजाने आपल्याला खूप काही दिले आहे. त्यामुळे समाजासाठी आपणही काहीतरी देणे लागतो,’ या आमदार लांडगे यांच्या विचारातून हा उपक्रम राबविण्यात आला. संकटाच्या काळात गरजू कुटुंबांच्या पाठीशी उभे राहण्याचा संदेश नागरगोजे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या मदतकार्याच्या माध्यमातून दिला.

“समाजाने आपल्याला खूप काही दिलं आहे. त्यामुळे संकटाच्या काळात गरजू कुटुंबांच्या पाठीशी उभं राहणं ही आपली जबाबदारी आहे. महेशदादांनी वाढदिवसाच्या शुभेच्छांना लोकसेवेची जोड देण्याचं आवाहन केलं. त्याला प्रतिसाद देत आम्ही सहकाऱ्यांसह डेहणे आणि नायफड येथील ४०० कुटुंबांपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची मदत पोहोचवली. या मदतीने एखाद्या घरची रोजची चिंता थोडी जरी हलकी झाली, तरी महेशदादांना दिलेल्या शुभेच्छांना खरा अर्थ मिळाला, असं मी मानेन.”
– योगिता नागरगोजे, नगरसेविका, भाजपा.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!