spot_img
spot_img
spot_img

महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविणाऱ्या अमोल जाधवर यांचा महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते सत्कार

शबनम न्यूज | प्रतिनिधी

महावितरणच्या राज्यस्तरीय आंतरपरिमंडलीय क्रीडा स्पर्धा २०२६-२७ अंतर्गत आयोजित ‘करवीर क्रीडास्पंदन २०२६’ या स्पर्धेत खो-खो क्रीडाप्रकारात उल्लेखनीय कामगिरी करून सुवर्णपदक पटकाविणाऱ्या अमोल जाधवर यांचा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील महापौर कक्षात महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

क्रीडा क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी सातत्यपूर्ण सराव, कठोर परिश्रम, जिद्द, शिस्त आणि संघभावना महत्त्वाची असते. अमोल जाधवर यांनी या गुणांच्या बळावर राज्यस्तरीय स्पर्धेत मिळविलेले यश निश्चितच कौतुकास्पद असून, त्यांची कामगिरी इतर खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे, असे महापौर लांडगे यांनी यावेळी सांगितले.

गुणवंत खेळाडूंच्या कामगिरीचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासह शहरातील क्रीडा संस्कृती अधिक समृद्ध करण्यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील आहे, असेही महापौर लांडगे यांनी नमूद केले.

अमोल जाधवर यांनी भविष्यातही आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर राष्ट्रीय स्तरावर यश संपादन करावे, अशा शुभेच्छा महापौर लांडगे यांनी यावेळी दिल्या.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!