spot_img
spot_img
spot_img

किराणा दुकानात सामान मागितल्याच्या कारणावरून ज्येष्ठ नागरिकाला मारहाण

शबनम न्यूज | प्रतिनिधी

किराणा दुकानात सामान आणि दूध घेण्यासाठी गेलेल्या ६० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला किरकोळ कारणावरून शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना तळेगाव दाभाडे येथील ज्ञानेश्वरनगर परिसरात घडली. आरोपीने पांढऱ्या रंगाच्या चारचाकी पांड्याने फिर्यादीच्या उजव्या पायावर घालून गंभीर दुखापत केल्याचा आरोप आहे. संभाजी तात्याबाबा राऊत (वय ६०, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास फिर्यादी हे ज्ञानेश्वरनगर येथे किराणा दुकानात सामान आणि दूध घेण्यासाठी गेले होते. त्यांनी दुकानदाराकडे कॅरीबॅग मागितली. त्यावेळी आरोपी राहुल बिराजदार हा दारूच्या नशेत घरातून बाहेर आला. त्याने फिर्यादीला उद्देशून शिवीगाळ केली आणि हाताने मारहाण केली. त्यानंतर फिर्यादी सामान आणि दूध घेऊन जात असताना आरोपीने पांढऱ्या रंगाची चारचाकी त्यांच्या अंगावर घातली. या वाहनामुळे फिर्यादीच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्याचवेळी फिर्यादींचा मुलगा रामलिंग याने वडिलांना वाचवण्यासाठी हाताने आडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या हाताच्या कोपराला दुखापत झाली. आरोपीने फिर्यादीला गंभीर जखमी करून घटनास्थळावरून पलायन केले.

याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५३१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(२), ११५(२), ३५१(२), ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी राहुल बिराजदार याच्याविरोधात पुढील तपास सुरू आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!