शबनम न्यूज | प्रतिनिधी
बांधकाम सुरू असलेल्या साइटवरून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ४० हजार रुपये किमतीच्या ३० लोखंडी सेंट्रिंग प्लेट चोरून नेल्याची घटना काळेवाडीतील विजय नगर परिसरात घडली. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकाने काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नाझीम हकीम अन्सारी (वय ३७, रा.देहूरोड, पुणे) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. आरोपी अज्ञात चोरटे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ नोव्हेंबर रोजी रात्री ११ ते १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० या कालावधीत समर्थ कॉलनी, निर्मल बेथनी इंग्लिश स्कूलजवळ, विजयनगर, काळेवाडी येथील बांधकाम साइटवर ही चोरी झाली. बांधकामाच्या ठिकाणी ठेवलेल्या एकूण ३० लोखंडी सेंट्रिंग प्लेट अज्ञात इसमांनी चोरून नेल्या. या प्लेटची एकूण किंमत अंदाजे ४० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेबाबत २४ नोव्हेंबर रोजी रात्री ८.१८ वाजता काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७३८/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांधकाम साइटवरील साहित्य चोरी करणाऱ्या अज्ञात चोरट्यांचा पोलीस शोध घेत आहेत.




Total Users : 244188